in

जुगारात हरला म्हणून शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखाची तरुणाला मारहाण

अनिल ठाकरे, प्रतिनिधी
चंद्रपूरातील वरोरा शहरातील आनंदवन चौकातील एका हॉटेलमध्ये जुगार खेळताना झालेल्या वादातून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन मत्ते यांनी एक तरुणाला मारहाण केली. या प्रकरणात मत्ते यांच्यासह चार जणांना वरोरा पोलिसांनी अटक केली.

पोळा सणाच्या पार्श्वभूमीवर आनंदवनातील या हॉटेलमध्ये मागील आठवड्याभरापासून मोठा जुगार सुरू होता. येथे जुगार खेळण्यासाठी भद्रावती तालुक्यातील पाटाळा येथील प्रवीण पारखी (30) आला. प्रवीणने जुगारात जवळपास पाच लाख रुपये जिंकले. त्याने एकहाती जुगारात सहभागी सर्वांचे खिसे रिकामे केले. त्यामुळे इतरांना त्यांच्यावर संशय आला. यावेळी नितीन मत्ते हेसुद्धा हजर होते. त्यांनीच प्रवीणच्या भ्रमणध्वनीत सेंसर आहे. त्यामुळे तो जुगार जिंकत असल्याचा आरोप केला. त्याला मत्ते आणि हॉटेल मधील इतर कर्मचाऱ्यांनी मारहाण केली.

गंभीर मारहाणीत प्रवीणला गंभीर दुखापत झाली. त्याला वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर चंद्रपुरातील शासकीय रुग्णालयात त्याला हलविण्यात आले. काल शुक्रवारी प्रवीणने वरोरा पोलिसात तक्रार दाखल केली. त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर मत्ते आणि इतर चार जणांवर भादंवि ३२४, १४३. १४७, १४९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी मत्ते ‘यांच्यासह चार जणांना अटक केली.
breaking news,

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

OBC आरक्षणासंदर्भात मोठी बातमी, निवडणुकांना स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

लोकशाही च्या बातमीचा दणका मंत्रालयाच्या अधिकाऱ्यावर छेडछाडीचा गुन्हा दाखल