in ,

शिवसेना शहर प्रमुखाची निर्घृण हत्या

नागपूर राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या तिवसा शहरातील आशिर्वाद वाईन बार समोर रात्री १०.३० वाजता अज्ञातांनी शिवसेनेचे तिवसा शहर प्रमुख अमोल पाटील वय 34 वर्ष यांची डोळ्यात मिरचीपूड टाकून हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे, अमोल पाटील यांच्यावर या पूर्वी दोन हत्याचा आरोप होता तर त्याला दीड महिन्यापूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दोन वर्षासाठी जिल्ह्या बाहेर तडीपाराचा आदेश देखील काढला होता तर ही हत्या अवैध धंद्यातुन झाली असल्याची चर्चा आहे.

अमोल पाटील हे मित्रा सोबत बार मध्ये आले होते, अमोल पाटील व त्याचा एक मित्र बार बंद झाल्याने बार समोर बसला होता, दरम्यान २ ते ३ अज्ञात आरोपींनी अमोल पाटील यांच्या डोक्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करत त्याला जागीच ठार केले, घटनेची माहिती मिळताच लागलीच तिवसा पोलीस निरीक्षक रिता उईके यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला, तर यावेळी मोठ्या प्रमाणावर नागरिकांची गर्दी होती, मात्र अद्यापही आरोपीचा शोध लागला नाही, तर राष्ट्रीय महामार्गावर वर्दळीच्या ठिकाणी राजकीय पदाधिकारी यांची हत्या झाल्याने जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न उपस्थित झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘फडणवीसांनी ‘ओबीसीं’चं नेतृत्व करावं पण आम्हाला आरक्षण परत मिळवून द्यावं’

जम्मू विमानतळावर मोठा स्फोट; फॉरेन्सिक आणि बॉम्बशोध पथक दाखल