in ,

Shiv Jayanti | फडणवीसांचा राज्य सरकारला टोला, मुघलांशी केली तुलना

विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरातील शिवजयंती उत्सवात सहभागी झाले. यावेळी त्यांनी विज बील आणि शिवजयंतीच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारवर टीका केली. फडणवीसांनी ठाकरे सरकारची थेट मुघलांशी तुलना केली आहे. राज्यात राजकीय पक्षांच्या मोठमोठ्या कार्यक्रमावर सरकार बंदी आणत नाही. मात्र, शिवजयंती साजरी करताना सरकारकडून कलम 144 लावलं जातं अशी बोचरी टीका त्यांनी महाविकासआघाडी सरकारवर केली आहे.

आम्हाला छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करण्यापासून कोणी रोखू शकत नाही. जेव्हापर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तेव्हापर्यंत जयंती साजरी होत राहिल, असंही फडणवीसांनी म्हटलं. तसेच ज्यांनी संविधान आणि महाराष्ट्र विधानसभेचे नियम वाचले नाही, तेच अध्यक्ष निवडीवरून राज्यपालांच्या भूमिकेवर संशय व्यक्त करू शकतात.

संविधानात सांगितले आहे, अध्यक्ष निवडीची तारीख राज्यपालनं ठरवून गुप्त मतदान पद्धतीनं ती निवडणूक करावी. त्यामुळे माझा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना सवाल आहे, की त्यांना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचं संविधान मान्य आहे की नाही? याशिवाय त्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील वाढीवरुनही राज्य सरकारला सुनवालं आहे. महाराष्ट्र सरकार जाणीवपूर्वक टॅक्स कमी करत नाही. केंद्र सरकारनं कृषिचा सेज पेट्रोल डिझेलवर लावून ३ रुपये टॅक्स कमी केला. मात्र, राज्य सरकार तसं करत नाही त्यामुळे राज्यातील जनतेला पेट्रोल डिझेलसाठी अधिक पैसे मोजावे लागतात, असा आरोपदेखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पेट्रोल, डिझेलच्या दरात सलग ११ व्या दिवशी वाढ; जाणून घ्या आजचे दर

मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी नेत्यांची बैठक – उदयनराजे भोसले