in

शिर्डी संस्थान राष्ट्रवादीला, पंढरपूर देवस्थान काँग्रेसकडे

शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थानचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसला तर पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुख्मिणी देवस्थानचे अध्यक्षपद काँग्रेसला देण्यात येणार आहे. मुंबईतील श्री सिद्धीविनायक ट्रस्टचे अध्यक्षपद हे शिवसेनेकडेच कायम राहील. महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत मंगळवारी यासोबतच महामंडळाच्या वाटपांचे सूत्रदेखील निश्चित करण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांनी दिली.

आघाडी सरकारच्या काळात १५ वर्षे शिर्डी संस्थानचे अध्यक्षपद हे काँग्रेसकडे तर पंढरपूच्या संस्थानचे अध्यक्षपद हे राष्ट्रवादीकडे होते. मात्र त्यात पहिल्यांदाच अदलाबदल करण्यात आला आहे. शिर्डी संस्थानमध्ये प्रत्येकी सहा विश्वस्तपदे ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसला तर पाच विश्वस्तपदे ही शिवसेनेला देण्यात येणार आहेत. राज्यात १५० महामंडळे, प्रमुख समित्या, प्राधिकरणे आणि आयुक्तालये आहेत. त्यांच्यावरील नियुक्त्या करताना शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसला द्यावयाच्या पदांचे सूत्रही ठरले. तिन्ही पक्षांनी आपापली नावे निश्चित करावीत आणि समन्वय समितीची लवकरच बैठक घेऊन त्यावर शिक्कामोर्तब केले जाईल, असेही आजच्या बैठकीत ठरले.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यात आघाडी सरकारचा हुकूमशाही पद्धतीचा कारभार

Petrol-Diesel Price | पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे दर