in

‘सेलिब्रेटींच्या टि्वटमुळे देशाचं झालेलं नुकसान भरून निघणार नाही’

लोकशाही न्यूज नेटवर्क

दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची चर्चा आता आंतरराष्ट्रीय स्तरावर होऊ लागली आहे. बॉलीवूड आणि क्रिकेट विश्वातील विविध सेलिब्रेटींनी यांसदर्भात टि्वट केले आहेत. यानंतर या प्रकरणाची जोरात चर्चा होत आहे. भारताविरोधात खोटा प्रचार होत असून त्यास बळी पडू नका, असं आवाहन अनेकांनी केलं आहे. यावर आता ज्येष्ठ काँग्रेस नेते शशी थरूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. देशाच्या प्रतिमेला तडा गेला आहे. आता काही मोजक्या सेलिब्रिटींच्या टि्वटनं ते नुकसान भरून निघणार नाही, असं शशी थरूर यांनी म्हटलंय.

पॉप सिंगर रिहाना आणि पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गसह अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांची पुतणी मीना हॅरिस यांनीही शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. यानंतर देशातील क्रिकेट आणि चित्रपटसृष्टीतील अनेकांनी टि्वट करत देशाला बाहेरील शक्ती प्रभावित करू शकत नाहीत, असं म्हटलं आहे.

दरम्यान, जगभरातून शेतकरी आंदोलनावर पडसाद उमटू लागल्यानंतर परराष्ट्र मंत्रालयानं नाराजी व्यक्त केली आहे. देशातील एखादा विषय समजून न घेता अशापद्धतीनं वक्तव्य करणं चुकीचं आहे, असं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शिवसेना फेरीवाल्यांकडून खंडणी उकळते; हा घ्या पुरावा…

‘तुम्हाला सेलिब्रेटी कोणी केलं हे विसरलात का’?