‘बिग बॉस मराठी’ या रिअॅलिटी शोमुळे प्रकाशझोतात आलेली मराठी अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतची एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. या पोस्टमध्ये शर्मिष्ठाने प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता मंदार देवस्थळी यांच्यावर पैसे थकवल्याचा आरोप केला आहे. कृपया बोला, घाबरू नका, असेही तिने म्हटले आहे. ‘हे मन बावरे’ या मालिकेत सध्या शर्मिष्ठा काम करत आहे.
‘गेली 13 वर्षे कलाक्षेत्रात काम करतेय. आजपर्यंत कोणत्याही निर्मात्याने पैसे बुडवले नाहीत. आजही आणि यापूर्वीही पण कायम चॅनलने आम्हाला मदत केली. परंतु एक प्रसिद्ध निर्माता मंदार देवस्थळी, त्याने सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यांचे पैसे थकवले. हे कोणत्याही क्षेत्रात होऊ शकत. कृपया घाबरू नका… बोला… पाठींबा द्या आणि आमच्यासाठी प्रार्थना करा,’ असे कॅप्शन देत शर्मिष्ठाने ही पोस्ट शेअर केली आहे.
दरम्यान मृणाल दुसानीस, संग्राम साळवी , विदिशा म्हसकर या कलाकारांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत शर्मिष्ठा पाठिंबा दिला आहे. त्यांचेही पैसे थकवल्याचा आरोपही या कलाकारांनी निर्मात्यांवर केला आहे.
अभिनेत्री मृणाल दुसानीस हिने देखील आपल्या इन्स्टाग्राम पोस्ट एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये तिने म्हटंले आहे की, मी गेली अनेक वर्ष टेलिव्हिजनमध्ये काम करते, मी कधीही कोणत्याही निर्मातांचे पैसे बुडवले नाहीत किंवा कोणत्या निर्मात्याने माझे पैसे बुडवले नाहीत. मात्र, मला अशा एक अनुभव आला आहे ते म्हणजे प्रसिद्ध निर्माता @mandarr_devsthali त्याने सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ ह्यांचे पैसे थकवले आहेत. अशाप्रकारची पोस्ट शेअर करून मृणाल दुसानीस हिने मानधन थकवल्याचा आरोप केला आहे. यामुळे याप्रकरणात निर्मात्याच्या विरोधात सर्व कलाकार एकवटले असल्याचे दिसत आहे.
मंदार देवस्थळी यांनी आतापर्यंत अनेक मराठी मालिका दिग्दर्शित केल्या आहेत. यामध्ये बोक्या सातबंडे, आपली माणसं, झुंज, आभाळमाया, किमयागार, वसुधा, वादळवाट, अवघाची संसार, होणार सून मी या घरची, अशा मालिकांचा समावेश आहे.
Comments
Loading…