in

सेन्सेक्सने ओलांडला ऐतिहासिक टप्पा

Share

लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक असलेल्या सेन्सेक्सने 49 हजाराचा विक्रमी टप्पा ओलांडला. आंतरराष्ट्रीय बाजारातील सकारात्मक कल आणि परकीय गुंतवणुकदारांच्या उत्साहामुळे भारतीय शेअर बाजारात मोठी उसळी पाहायला मिळाली. भांडवली बाजाराच्या आजवरच्या इतिहासात सेन्सेक्सने पहिल्यांदाच ही पातळी गाठली आहे. तर तेफ्टी मध्ये सुद्धा 14,400 ची वाढ झाली आहे.

आज भांडवली बाजार उघडल्यानंतर सेन्सक्सने सुरुवातीच्या सत्रात 400 अंकांची उसळी घेतली. या तेजीत आयटी कंपन्यांच्या समभागांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. त्यामुळे सेन्सेक्स 49, 260.21 चा ऐतिहासिक स्तर गाठला. तर निफ्टीमध्येही 112.45 अंकांची उसळी पाहायला मिळाली. त्यामुळे निफ्टी 14,459.70 च्या स्तरावर पोहोचला.

भांडवली बाजारातील या तेजीत इन्फोसिस, एचसीएल टेक, आईटीसी, एचडीएफसी बँक, भारतीय एअरटेल, एचयूएल आणि टीसीएस या कंपन्यांच्या समभागांचा 3.45 टक्क्यांनी भाव वधारला आहे. तर दुसरीकडे एक्सिस बँक, मारुती, ओएनजीसी, बजाज फायनान्स आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांचे भाव 0.99 टक्क्यांनी खाली पडले आहेत.

कोरोना महामारीच्या काळानंतर मागील काही आठवड्यांपासून शेअर मार्केट स्तिरावत आहे. तज्ञाच्या मते मागील काही आठवड्यांपासून टीसीएसची रिलायन्सच्या तोडीस तोड कामगिरी करत आहे. शुक्रवारी टीसीएसच्य शेअरमध्ये 7.2 टक्क्यांची वाढ दिसून आली.

भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी असलेल्या टाटा कन्सलटन्सीने एकूण भांडवली मूल्य 12 लाख कोटींवर पोहोचले आहे. इन्फोन्सिच्या समभागाची किंमत तब्बल दोन टक्क्यांनी वाढत 3175 इतकी झाली.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

पाकिस्तानात अस्थिरता माजवण्याचे प्रयत्न भारताकडून केला जातो, इम्रान खान यांचा आरोप

IND vs AUS; तिसरा कसोटी सामना अनिर्णीत