लोकशाही न्यूज नेटवर्
मुंबई शेअर बाजाराने आठवड्याच्या पहिल्या दिवशी जोरदार उसळी मारली आहे. पहिल्यांदाच सेन्सेक्सने 52000 चा आकडा ओलांडला आहे. गेल्या काही दिवसांमध्ये शेअर बाजारामध्ये अनेक रेकॉर्ड पाहायला मिळत आहेत. निफ्टीही 50 आज सकाळी 107 अंकांच्या वाढीसह 15270 वर उघडला. यावेळी 138 अंकांच्या वाढीसह 15301 च्या पातळीवर बाजार सुरु होता.
बँकिंग शेअर्समध्येही मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. सध्या इंडसइंड बँक, एचडीएफसी बँक, अॅक्सिस बँक आणि कोटक महिंद्रा बँक सगळ्यात टॉपवर आहेत. दुसरीकडे, ओएनजीसी, टेक महिंद्रा, एनटीपीसी आणि सन फार्मा या कंपन्यांचा घसरल्याचं पाहायला मिळत आहे. विदेशी गुंतवणूक म्हणजेच एफपीआयने फेब्रुवारीमध्ये 22 हजार कोटी रुपये गुंतवणूक केली आहे.
Comments
Loading…