in

शरद पवारांचा नाशिक दौरा ; मराठा क्रांती मोर्चा समनव्यकांना घरातच केलं स्थानबद्ध

Share

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आज नाशिकच्या दौऱ्यावर आहे. पण या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चा समनव्यकांना पोलिसांनी नोटीसा बजावल्या आहेत. शरद पवार यांच्या दौऱ्यात घोषणाबाजी आणि विरोध करण्यास प्रतिबंध केला आहे.

पोलिसांनी मराठा क्रांती मोर्चा समनव्यकांना कलम 149 ची नोटीसा बजावल्या असून घरातच केलं स्थानबद्ध करण्यात आलं आहे. कांदा उत्पादक आणि व्यापाऱ्यांची भेट घेण्यासाठी शरद पवार हा दौरा करत आहे. शरद पवार त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. कांदा व्यापारांनी अघोषित संप पुकारल्यामुळे तोडगा काढण्यासाठी शरद पवार मध्यस्थी करणार आहेत. त्याचबरोबर ते दिवंगत माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या कुटुंबियांची सांत्वना भेट घेणार आहेत.

दरम्यान, केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या मर्यादेला कांदा व्यापाऱ्यांकडून विरोध केला जात आहे. गेल्या दोन दिवसांपासून कांदा लिलाव बंद आहे. कांदा साठवणीवर मर्यादा घातल्यामुळे व्यापाऱ्यांनी खरेदी बंद केली आहे. यावर आता शरद पवार तोडगा काढतात का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

मराठी भाषेची चीड येते म्हणणाऱ्या जान कुमारला मनसेचा इशारा

कंगना VS बीएमसी वादात पालिकेने सोसला 82 लाख 50 हजारांचा भुर्दंड