in

शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांना सांगितल्या ‘या’ ४ युक्तीच्या गोष्टी

शरद पवार यांना सध्या विश्रांतीची गरज आहे, पण एक तर स्वतः पवारांना विश्रांती या शब्दाशी वैर आहे, दुसरे म्हणजे त्यांचे चाहते आणि विरोधकही पवारांना विश्रांती घेऊ देत नाहीत. पवारांचे चाहते देवेंद्र फडणवीस हे पवारांना त्यांच्या घरी जाऊन भेटले. ‘‘आता ही भेट नक्की कशासाठी झाली? काहीतरी राजकारण शिजत आहे. फडणवीस हे उगाच जाऊन असे भेटणार नाहीत. वरचा काहीतरी निरोप वगैरे घेऊनच फडणवीस गेले. त्यामुळे ‘ऑपरेशन कमळ’ आता नक्की,’’ असे फुगे सोडण्याचे काम परंपरेप्रमाणे सुरू झाले असा टोला शिवसेनेने भाजपाला लगावला आहे.

शरद पवारांनीही अनेक सरकारे बनवली व पाडली असतील, पण आजचा विरोधी पक्ष ज्या पद्धतीने वागत आहे त्यावर पवार यांनी फडणवीसांना नक्कीच चार युक्तीच्या गोष्टी सांगितल्या असतील. कोणीही सदा सर्वकाळ सत्तेवर राहत नाही. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेला नाही. राम–कृष्णही आले–गेले तेथे आजचे राजकारणी कोण? देश आणि राज्यावरचे संकट मोठे आहे. उत्तर प्रदेश, बिहारात गंगेत प्रेते तरंगत आहेत. वाहत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राची स्थिती नक्कीच नियंत्रणाखाली आहे. फडणवीस–पवार भेटीत हा विषयही चर्चेला आला असेलच. पवार–फडणवीस भेटीत रहस्य किंवा गूढ असे काहीच नाही. कोणाला त्यात रहस्यमय वगैरे वाटत असेल तर ते पवारांना ओळखत नाहीत असेच म्हणावे लागेल, असा चिमटाही सामना अग्रलेखातून विरोधकांना काढण्यात आला आहे.

काय म्हटलं अग्रलेखात?

फडणवीस यांच्या म्हणण्याप्रमाणे ही निव्वळ सदिच्छा भेटच होती व ते खरेच आहे. पवार हे महाराष्ट्राचेच नव्हे, तर राष्ट्रीय राजकारणातील ज्येष्ठ नेते आहेत. पंतप्रधान मोदींपासून इतर अनेक पक्षांतील लोक त्यांच्याशी सल्लामसलत करीत असतात. आपल्या लोकशाहीचे हे सगळय़ात मोठे वैशिष्टय़ आहे. आमची लोकशाही ही बंदिस्त किंवा डोळय़ांना झापडं लावलेली नाही. येथे संवादाला महत्त्व आहे.

पुन्हा जेव्हा जेव्हा आपल्या देशात हुकूमशाही की लोकशाही असा सवाल निर्माण होतो त्या त्यावेळी लोकशाहीचाच जय होतो. त्या लोकशाहीत विरोधी पक्षाचे स्थान महत्त्वाचे आहे. इंदिरा गांधी यांचा पराभव जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखालील जनता पक्षाने केला. त्याआधी इंदिराजींनी जयप्रकाश यांच्यासह विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकले, तरीही पराभूत झालेल्या इंदिरा गांधी जयप्रकाश नारायण यांना भेटून त्यांचा आशीर्वाद घेत असत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Rain Update | राज्यात काही जिल्ह्यात मुसळधार पाऊस

खासदार इम्तियाज जलील यांच्याविरोधात गुन्हा दाखल