लोकशाही न्यूज नेटवर्क
सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी न्यायपालिकेबाबत केलेल्या विधानांमुळे न्यायव्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. देशाची न्यायव्यवस्था जीर्ण झाली आहे, असं त्यांनी म्हटलं. एवढंच नाही तर मी कुठल्याही गोष्टीसाठी न्यायालयात मुळीच जाणार नाही, तिथं तुम्हाला न्याय मिळत नाही, असे खळबळजनक वक्तव्य निवृत्त सरन्यायाधीश आणि राज्यसभेचे खासदार रंजन गोगोई यांनी केले आहे. त्यावर आता विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संबंधित प्रकरणावर प्रतिक्रिया देत, हे विधान धक्कादायक असल्याचं सांगितलं. त्यांनी न्याय व्यवस्थेबाबत त्यांच्या परीने सत्य सांगण्याचा प्रयत्न केला की नाही, हे मला ठाऊक नाही, असे पवार म्हणाले. मात्र, त्यांचं हे विधान प्रत्येकाला चिंता करायला लावणारं आहे, याबाबत माझ्या मनात शंका नाही, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिलीय.
Comments
Loading…