पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. त्यामुळे प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. खरी लढत तृणमूल काँग्रेस आणि भाजपामध्ये आहे. अशा वेळी तृणमूल काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेसने जाहीर पाठिंबा दिला आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तीन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत.
पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या दिग्गज नेत्यांचे दौरे सुरू आहेत. भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे दौरे झाले. यानिमित्ताने भाजपामध्ये इनकमिंग जोरात सुरू आहे.
या पार्श्वभूमीवर येत्या 1 एप्रिलला शरद पवार पश्चिम बंगालमध्ये जात आहेत. तिथे ते तृणमूल काँग्रेस उमेदवारांच्या काही रॅलीत सहभागी होणार आहेत. 2 एप्रिलला तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून ते पत्रकार परिषद घेतील. त्यानंतर 3 एप्रिलला ममता बनर्जी यांच्यासोबत पवार रॅलीत सहभागी होणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली.
Comments
Loading…