राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. केंद्रात गेली ६ वर्ष तुमचं सरकार आहे. आमच्याकडून अनेक चुका झाल्या तर मग या सहा वर्षात त्या दुरुस्त करता आल्या नाहीत का, असा सवाल करत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पंतप्रधान मोंदीना टोला लगावला आहे. बारामतीमधील माळेगाव बु. इथं एका कार्यक्रमात पवार बोलत होते.
पंतप्रधान मोदी यांनी पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीला यूपीए सरकारचं त्यावेळचं धोरण कारणीभूत असल्याचा आरोप केला आहे. याबाबत विचारणा केली असता, केंद्र सरकारमध्ये ६ वर्षे सत्तेत असतानादेखील चुका दुरुस्त करता येत नसतील, त्यावर चर्चा काय करायची, असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.
पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतीला यूपीए सरकारचं त्यावेळचं धोरण कारणीभूत असल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला होता. त्यांच्या या आरोपांना शरद पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दररोज चढउतार पाहायला मिळत आहेत.
Comments
Loading…