in

विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच…पवारांचे संकेत

लोकशाही न्यूज नेटवर्क

नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही नेत्यांची नाराजी समोर आली होती. यानंतर आता विधानसभा अध्यक्षपद कोणत्या पक्षाकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष्य होतं. पटोले यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यभार स्वीकारला आहे. यानंतर त्यांची जागा घेण्यासाठी काही उत्सुक राजकीय नेत्यांची नावंही समोर आली होती. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे.

नाना पटोले यांची रिक्त झालेली विधानसभा अध्यक्षपदाची जागा काँग्रेसची आहे. त्यामुळे ती काँग्रेसकडेच राहणार असल्याचे पवार यांनी सांगितले. मात्र, तीन पक्षांचे सरकार असल्याने मुख्यमंत्री आणि अन्य नेत्यांच्या संगनमताने निर्णय होईल, असे पवार म्हणाले.

सरकार स्थिरस्थावर होत असताना, नाना पटोलेंनी राजीनामा दिल्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नाराज असल्याच्या बातम्या येत होत्या.

आज पुण्यात शरद पवारांना या बद्दल प्रश्न विचारण्यात आला, यावेळी ‘विधानसभा अध्यक्षपद ही काँग्रेसची जागा असल्याचे पवारांनी सांगितले. विधानसभा अध्यक्षपद, मुख्यमंत्री या जागा पक्षाच्या असल्या तरी सहकाऱ्यांशी विचारविनिमय करण्याची एक पद्धत आहे’, असे पवार म्हणाले. नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस त्या पदावर दावा सांगणार अशी सुद्धा चर्चा सुरू होती. मात्र, आता शरद पवार यांनी पूर्णविराम लावला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

इंग्लंड ८ बाद ५५५… जो रूटचा द्विशतकी दणका

देशभरात चक्काजामला मोठा प्रतिसाद; शांततेत आंदोलन यशस्वी