in

शांताबाईंचा थरारक व्हिडीओ होतोय व्हायरल; 85 व्या वर्षातही तरुणाईला लाजवणारी कर्तबगारी

Share

तुम्ही वयाची ऐंशी पार केलेय आणि आता तुम्हाला काय करावसं वाटतं? असा प्रश्न कोणी विचारला, तर तुमचं उत्तर काय असेल? सहाजिकच आराम करण्यासंदर्भातलं ते उत्तर असेल. पण आम्ही आज अशा अज्जीबाईंची भेट तुम्हाला करून देणार आहोत, ज्या वयाच्या 85 व्या वर्षातही जगण्यासाठी आणि नातवांचा सांभाळ करण्यासाठी धडपड धडपड करत आहेत.

शांताबाईंनी आयुष्यभर डोंबाऱ्याचा खेळ करून पैसे कमवले. तिच्यासोबत असणाऱ्या पोरांनी फार शिकावं आणि मोठं व्हावं, असं तिला रोजच वाटत असतं. मुलांचा सांभाळ करण्यासाठी आणि त्यांना शिक्षण मिळावं यासाठी ती रोज कोणत्या ना कोणत्या रस्त्यावर लाठी फिरवत असते आणि पैसे कमवत असते. काही दिवासांपूर्वी हातावर काचेची बाटली फुटली, त्यामुळे पैसे कमवण्याची सगळी साधने बंद पडली, एवढ असलं तरी हात बरा झाला की पुन्हा खेळ सुरू करेन, असा आत्मविश्वास तिला होता आणि ती हाताला सहा टाके पडूनही आता पुन्हा लाठी फिरवून आपलं आणि आपल्यासोबत असलेल्या मुलांचं पोट भरत असते.

आज अशाच जिवानाशी संघर्ष करणाऱ्या आजीबाईंना म्हणजेच रस्त्यावर संघर्ष करणाऱ्या शांताबाईना आपल्या सगळ्याच्या मदतीची गरजे आहे. शांताबाई या सध्या सर्वे नं. 106, कांबळे मंडप जवळ, गोसावी वस्ती, वैदूवाडी, हडपसर, पुणे येथे राहातात. आज त्यांना मदतीची गरज आहे. चला तर लोकशाहीच्या माध्यमातून आपण सर्व मिळून शांताबाईंना मदतीचा हात पुढे करू.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

deepika and priyanka

दीपिका, प्रियंका चोप्राच्या प्रचंड फॉलोअर्समधली फेक अकाऊंट्स आली समोर…

एक डोळा हासू एक डोळा आसू देत रंजक राईड घडवणारा दिल बेचारा, वाचा सिनेमाचा सखोल रिव्ह्यू