in ,

देशात प्रथमच एका महिलेला फाशी; वाचा काय आहे प्रकरण?

कुटुंबातील ७ जणांची निर्घुण हत्या केल्यामुळे शबनमला फाशीची शिक्षा सुनावण्यात आलीये…आपली शिक्षा रद्द व्हावी अशी मागणी करत शबनमनं राष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्याकडे दयेचा अर्जही केला होता…मात्र, राष्ट्रपती 2015च्या सप्टेंबरमध्ये उत्तर प्रदेशचे तत्कालीन राज्यपाल राम नाईक यांनीदेखील शबनमची दया याचिका फेटाळून लावली होती…त्यामुळे शबनमला मथुरा तुरुंगात फाशी दिली जाणारे, हे आता निश्चित झालंय…आणि अशाप्रकारे फासावर जाणारी शबनम ही स्वतंत्र भारतातील पहिली महिला ठरणार आहे…

काय आहे प्रकरण?
14 एप्रिल 2008 या दिवशी उत्तर प्रदेशातल्या अमरोहाच्या बाबनखेडी या गावात देशाला हादरवणारी घटना घडली…शबनमचं गावातल्याच सलीम नावाच्या व्यक्तिवर प्रेम होतं…शबनम गरोदरही होती…मात्र, त्यांचं लग्न लावून द्यायला कुटुंबीयांचा नकार होता…याच रागातून शबनमनं सलीमला १४ एप्रिल २००८ला आपल्या घरी बोलावलं…कुटुंबातील लोकांच्या जेवणात शबनमनं झोपेच्या गोळ्या मिसळवल्या होत्या…त्यामुळे कुटुंबीय गाढ झोपेत होते…आणि त्याचवेळी सलीमसोबत मिळून शबनमनं तब्बल ७ जणांची कुऱ्हाडीनं गळा कापून हत्या केली…यात शबनमचे वडील शौकत अली, आई हाश्मी, भाऊ अनीस अहमद, त्याची पत्नी अंजुम, पुतणी रााबिया, भाऊ राशिद आणि अनीसच्या १० महिन्यांच्या मुलाची हत्या केली..या घटनेनं संपूर्ण देश हादरला होता…

फाशीची शिक्षा होणारी पहिलीच महिला –
शबनमच्या फाशीच्या शिक्षेनं आणखी एका अशाच भयानक घटनेची आठवण होतीये…तुम्हाला रेणुका शिंदे आणि सीमा गावित या बहिणींची आठवण होतीये का…कोल्हापुरात राहणाऱ्या या बहिणींनी आई अंजनासोबत मिळून अनेक मुलांचं अपहरण करून त्यांची हत्या केली होती…त्यांनी १३ मुलांचं अपहरण केलं होतं…अन् त्यातील १० मुलांची हत्या केली होती…याप्रकरणी १९९६ साली या बहिणींना अटक झाली…२००१ साली कोल्हापुरच्या सत्र न्यायालयानं त्यांना दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावली…यानंतर २००६ साली सर्वोच्च न्यायालयानंही त्यांना दोषी ठरवत फाशीची शिक्षा कायम ठेवली…मात्र, फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झाली नव्हती. यातील एकीचा तुरुगांतच मृत्यू झाला… त्यामुळे गावित भगिनी या स्वतंत्र भारतात फाशीची शिक्षा मिळालेल्या पहिल्या महिला आहेत…त्यानंतर सोनिया नामक महिलेची 2007 साली सर्वोच्च न्यायालयानं फाशी कायम केली होती. फाशीची शिक्षा मिळालेली शबनम ही तिसरी महिला…मात्र, फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी झालीच तर शबनम ही फाशीची शिक्षा दिलेली पहिली महिला ठरू शकते…

महिलांसाठीचे एकमेव फाशीघर –
देशात फक्त मथुरेच्या कारागृहातच महिलांना फाशी द्यायची सोय आहे. याठिकाणी 150 वर्षांपासून महिलांना फाशीची शिक्षा द्यायची सोय करण्यात आलीये….महिलांना फाशी देण्यासाठी मथुरा तुरुंगात 1870 मध्ये फाशी घर बनवण्यात आलं होतं. पण आतापर्यंत इथं एकाही महिलेला फाशी देण्यात आलेली नाहीये….अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत पडलेल्या या फाशीघराची डागडुजी करण्यात येतीये…मथुरा कारागृहात शबनमला फाशी देण्याची तयारी सुरू झालीये.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कठोर निर्णय घ्यायची वेळ येऊ देऊ नका- अजित पवार

राज्यातील ‘या’ तीन जिल्ह्यांत पुन्हा लॉकडाऊन?