in

पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात; चौघांचा मृत्यू

लोकशाही न्यूज नेटवर्क

पुणे बंगळूर महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात चौघांचा मृत्यू झाला आहे. भरधाव चारचाकीवरील नियंत्रण सुटल्याने चालकासह अन्य तिघांचा मृत्यू झाला आहे. तसेच एकजण गंभीर जखमी आहे.

अपघातात चारचाकीचा चुराडा झाला आहे. ही कार कोल्हापूरहून पुण्याकडे येत होती. दुपारच्या सुमारास कराडच्या हद्दीत आल्यानंतर चालकाचे मोटारीवरील नियंत्रण सुटले. यामुळे चारचाकी महामार्ग ओलांडून पुढच्या लेनमध्ये घुसली. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला असून एकाचा रुग्णालयात नेताना मृत्यू झाला. तसेच अन्य एकजण गंभीर जखमी आहे.

अपघातात चारचाकीचा चुराडा झाला आहे.

याठिकाणी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. यामुळे काही वेळ वाहतूक खोळंबली होती. मात्र महामार्ग पोलिसांनी वेळीच धाव घेत वाहतूक सुरळीत केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

संबित पात्रा तर नरेंद्र मोदी यांच्याही पुढे…

IND Vs ENG : तिसऱ्या दिवसाअखेर भारत ६ बाद २५७