in

सात अजुबे इस दुनिया के आठवा माननीय मुख्यमंत्री हैं – सुधीर मुनगंटीवार

भाजपाचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते आमदार म्हणून निवडून आलेले आमदार सुनील राणे यांच्या द्वितीय कार्यअहवालाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. याशिवाय त्यांनी सांगितले की, मुंबईमध्ये महापौर हा भाजपाचाच बसणार

या कार्यक्रमाच्यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी सरकारवर चांगलाच निशाणा साधला म्हणाले की, “आमदार म्हणून दोन वर्षी केलेली कामे जनतेसमोर ठेवण्यात येत आहे. जनतेला विश्वासघात आणि धोका देऊन हे सरकार स्थापन झाले असून गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रात कर्णधार यांनी एकही दिवस मंत्रालयात न जाण्याचा रेकॉर्ड ब्रेक केला असून याची देखील नोंद केली पाहिजे. सात अजुबे इस दुनिया के आठवा अजुबा माननीय मुख्यमंत्री हैं”, असं म्हणत मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका केली.

यासोबतच ते म्हणाले की, मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की थांबले पाहिजे आता, राजकारणामध्ये सर्वात गलिच्छ कार्यक्रम सुरु आहे. “स्वतःला वाचवण्यासाठी दुसऱ्याला दोष देण्याचा हा प्रकार सध्या सुरु आहे. स्वतःचे केलेले पाप झाकण्यासाठी दुसऱ्याकडे बोट दाखवायचे हर्बल वनस्पती गांजाचे नवीन नाव मी ऐकत आहे. उद्या तर हे नेते म्हणतील की, विद्यार्थ्यांमध्ये उत्साह येण्यासाठी त्यांना हर्बल वनस्पती सध्या शाळेतच द्या”, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“तुम्ही रोहितला संघाबाहेर करणार का?”, पत्रकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना विराटला आवरलं नाही हसू!

पंतप्रधान मोदी आज वाराणसी दौऱ्यावर