in

सेन्सेक्स 1300 अंकांनी कोसळला, दोन तासांत 6 लाख कोटींचे नुकसान

कोरोनाच्या नवीन वेरिएंटमुळे जगभरात एकच खळबळ उडाली आहे. परिणामी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स तब्बल १४०० अंकांनी कोसळला तर निफ्टीमध्ये ४०० अंकांची पडझड झाली. या प्रचंड आपटीने बाजारात साडे सहा लाख कोटींचा चुराडा झाला.

आज बाजार सुरु होताच चौफेर विक्रीचा सपाटा सुरु झाला. सेन्सेक्स १३३९ अंकांनी कोसळला असून तो सध्या ५७४५५ अंकावर ट्रेड करत आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी ३८७ अंकांच्या घसरणीसह १७१४९ अंकांपर्यंत खाली आला आहे. या पडझडीने मुंबई शेअर बाजारातील कंपन्यांचे बाजार भांडवल ६.५५ लाख कोटींनी कमी झाले असून ते २५९.११ लाख कोटी इतके झाले आहे. बाजार सुरु होण्यापूर्वी एकूण बाजार भांडवल २६५.६६ लाख कोटी इतके होते.

सेन्सेक्स मंचावरील ३० पैकी २९ शेअर घसरले आहेत. डॉ. रेड्डी लॅब वगळता सर्वच क्षेत्रात विक्रीचा मारा सुरु आहे. पॉवरग्रीड, सन फार्मा, टीसीएस, एचसीएल टेक, टेक महिंद्रा, बजाज ऑटो, आयटीसी, इंडसइंड बँक, टाटा स्टील, कोटक बँक, रिलायन्स, एसबीआय, एनटीपीसी या शेअरमध्ये मोठी घसरण झाली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

“जर कोरोना व्यक्ती असता तर त्याला बॉक्सिंग रिंगमध्ये घेऊन…!” आनंद महिंद्रांचे संतप्त ट्वीट

शरद पवारही दिल्लीला रवाना; फडणवीसही राजधानीत असल्याने राजकीय चर्चांना उधाण