in

जेष्ठ अभिनेत्री शशिकला यांचे निधन

७० च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री शशिकला यांचे वयाच्या ८८ व्या वर्षी निधन झाले आहे. आज दुपारी १२ च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कुलाबा येथील चर्चमध्ये शोकसभा ठेवण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. शशिकला यांच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. शशिकला यांचे सिनेसृष्टीत योगदान मोठे होते. विशेष म्हणजे प्रमुख अभिनेत्री म्हणून काम करता करता त्यांनी खलनायिका म्हणून वेगळीच छाप पाडली. सोलापुरातल्या एका सधन कुटुंबात जन्म झालेल्या शशिकला यांचं बालपण ऐशोआरामात गेलं. बालपणापासूनच त्यांना नृत्याची आणि अभिनयाची आवड होती. शशिकला जवळकर लग्नानंतर शशिला ओमप्रकाश सैगल बनल्या.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नक्षलवाद्यांविरोधातील लढ्यात २२ जवान शहीद

VIVO चा नवा Vivo X60t 5G फोन लाँच