in

आर्यन खानला व्यसनमुक्ती केंद्रात पाठवा; राज्यमंत्री रामदास आठवलेंचा शाहरुख खानला सल्ला

आर्यन खान प्रकरणावरुन सध्या नवीनवीन वाद निर्माण होत आहे. अशातच आता केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी समीर वानखेडे यांना पाठिंबा दिला आहे आणि वानखेडेंनी काहीही चुकीचे केले नसल्याचे म्हटले आहे.

यासोबतच आठवले यांनी शाहरुख खानला एक सल्ला देखील दिला आहे की, आर्यन खानला एका महिन्यासाठी व्यसनमुक्ती केंद्रात पाठवावे.

वानखेडे यांना पाठिंबा देताना रामदास आठवले म्हणाले की, आमची रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (RPI) NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्या पाठीशी उभी राहील. वानखेडे यांच्यावरील आरोप निराधार आणि खोडसाळ आहेत. आणि ” मी शाहरुख खानला विनंती करतो की आर्यन खानने सुधारणा करावी.त्याला एक-दोन महिने व्यसनमुक्ती केंद्रात दाखल करावे, असा माझा सल्ला आहे. असे त्यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Petrol Diesel Price: पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाचे नवे दर जाहीर; आजचा दर काय?

सोन्याची किंमत कमी, मात्र चांदीचे भाव वाढले ; आजचा दर जाणून घ्या