in ,

तृतीयपंथीयांना रक्तदानाचा अधिकार देण्याबाबत याचिका; केंद्राला नोटीस

तृतीयपंथीय, समलैंगिक आणि वेश्या रक्तदान करू शकत नाहीत, या केंद्र सरकारच्या निर्णयाला एका याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला नोटीस बजावली आहे. एचआयव्ही आणि एड्सचा धोका पाहता त्यांना रक्तदान करण्यास बंदी आहे, असं केंद्र सरकारनं म्हटलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या 2017च्या गाईडलाईन्समध्ये या निर्णयाचा समावेश आहे.

सरन्यायाधीश शरद बोबडे, न्यायाधीश ए.एस,बोपण्णा आणि व्ही. रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठानं याचिकेवर सुनावणी घेतली. केंद्र सरकारच्या या निर्णयावर तत्काळ स्थगिती आणण्याच्या याचिकाकर्ते थंगजम संता सिंग यांचे वकील जयना कोठारी यांच्या मागणीवर बोलताना सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं की, ‘सर्वोच्च न्यायालय हे काही वैज्ञानिक विषयांमधील तज्ज्ञ नाही’.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या जाचक अटींमुळे लॉकडाऊनमध्ये तृतीयपंथीयांना रक्ताची गरज असताना त्यांना ते मिळू शकलं नाही, असं याचिकेत म्हटलं आहे. या निर्णयानुसार तृतीयपंथीय, गे आणि वेश्या यांना रक्तदान करता येणार नाही.

याचिकेमध्ये केंद्राच्या निर्णयावर अनेक आक्षेप नोंदवले गेले आहेत. ‘केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचा हा निर्णय अवैज्ञानिक आणि अपजानजनक आहे. रक्तदान करण्यापूर्वी सर्वांची चाचणी केली जाते. हेपॅटाईटीस बी, हेपॅटाईटीस सी, एचआयव्ही आणि एड्सच्या सर्व चाचण्या केल्या जातात. मग असं असताना हा खोडा का घातला गेला. केवळ लैंगिक विभिन्नतेमुळे तृतीयपंथीय, गे आणि वेश्यांचे मूलभूत अधिकार नाकारणं हे दुर्देवी आहे, असं याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे.

मतदानाचा अधिकार मग रक्तदान का नाही?

शासकीय कामकाजासाठीच्या कागदपत्रांवर पूर्वी पुरुष आणि स्त्री असे दोनच पर्याय होते. मात्र, त्यात आता आणखी एक पर्याय जोडला गेला आहे. तृतीयपंथीय पर्यात आता शासकीय कामकाजासाठी देण्यात आला आहे. तसंच अनेक ठिकाणी तृतीयपंथीय व्यक्ती निवडणूक लढवून जिंकूनही आले आहेत. मग असं असताना तृतीयपंथीय, गे आणि वेश्यांना रक्तदानाचा अधिकार नाकारणं चुकीचं आहे, असा सूर उमटत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महत्त्वाची बातमी : रेल्वे आरक्षण प्रणाली रात्रभर राहणार बंद, कारण…

पाकिस्तानमध्ये इम्रान खान यांची सत्ता वाचली, विरोधकांच्या अनुपस्थितीत जिंकला विश्वासदर्शक ठराव