in

उत्सुकता वाढवणारा सायली संजीव-सुव्रत जोशीच्या ‘गोष्ट एका पैठणीची’चा टीझर भेटीला

Share

काही महिन्यांपूर्वी सायली संजीव आणि सुव्रत जोशी ही फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला सज्ज झाली आहे अशी चर्चा होती. या जोडीचा नवीन सिनेमा ‘गोष्ट एका पैठणीची’ जाहीर देखील झाला. त्यानंतर काही दिवसांनी लॉकडाऊन घोषीत झालं आणि सिनेमाची चर्चा थोडी थंडावली. आता मात्र हा सिनेमा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे कारण आहे सिनेमाचा टीझर. या सिनेमाचा टीझर नुकताच सोशल मीडियावर रिलीज केला गेला आहे आणि त्या टीझरमुळे तुमची उत्सुकता वाढली नाही तरंच नवल.

आपण प्रत्यक जम काही स्वप्न घेऊन जगत असतो. त्यातली काही स्वप्न पूर्ण होतात तर कधी काही स्वप्नं अपूर्ण राहतात आणि मनाचा तळ ढवळून टाकणारी अस्वस्थता देतात. पण आशा निराशेने सजलेला हा स्वप्नांचा पाठलाग फार सुंदर असतो. एखाद्या पैठणी सारखा. असंच काहीसं या सिनेमाची कथा सांगणा आहे. नायिकेच्या मनातल्या अशाच गोजिऱ्या स्वप्नांचा प्रवास ‘गोष्ट एका पैठणीची’ या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाचा टीझर अगदी बऱ्याच गोष्टी सांगून जातो.

प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स सोबतच लेकसाइड प्रोडक्शन या सिनेमाची निर्मिती करत आहेत. अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि चिंतामणी दगडे हे सिनेमाचे निर्माते आहेत. शंतनू गणेश रोडे यांनी सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. सिनेमात सायली संजीव, सुव्रत जोशी ही जोडी दिसणार आहे हे टीझरमध्ये सुद्धा दिसतं. तसंच या दोघांसोबत शशांक केतकर, मिलिंद गुणाजी आदी कलाकार महत्त्वाच्या भूमिका साकारताना दिसतील. या व्यतिरिक्त सिनेमात दिसणाऱ्या इतर कलाकार मंडळींची नावं मात्र अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आली आहेत.

पैठणी म्हणजे प्रत्येक स्त्रीसाठी हळवा कोपरा असतो. टीझरमधून पैठणीच्या स्वप्नाची झलक दिसत असून, त्यामुळे हा टीझर समस्त महिला वर्गाच्या नक्कीच पसंतीला उतरेल असा वियस्वास सिनेमाच्या टीमला आहे. सध्या टीझर सर्वत्र पसंत केला जात आहे आणि त्यामुळे सिनेमाची उत्सुकता नक्कीच वाढणार आहे. सिनेमाच्या रिलीजबद्दल अद्याप काही कळू शकलेलं नाहीये. त्यामुळे सिनेमा लॉकडाऊनमध्ये डिजीटली रिलीज केला जातो की लॉकडाऊनंतर सिनेमागृहांमध्ये ते आता पहावं लागणार आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

तीन दिवसांत एसटीने २१ हजार ७१४ मजुरांना सुखरूप घरी पोहचविले – मंत्री अनिल परब

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचे २३ नवीन रुग्ण, दिवसभरात १३ जण बरे