in

बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान काळाच्या पडद्याआड

Share

बॉलिवूडला जवळपास 40 वर्ष आपल्या उत्कृष्ट कोरिओग्राफीने थिरकवणाऱ्या प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे आज पहाटे निधन झाल्याची घटना घडली. त्या 72 वर्षाच्या होत्या. सरोज खान यांच्या निधनाने बॉलिवूड शोकसागरात बुडाला आहे.

कोरिओग्राफर सरोज खान यांना वांद्रे येथील गुरूनानक हॉस्पिटलमध्ये श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे 17 जून रोजी ऍडमिट करण्यात आलं होतं.त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. यावेळी उपचारा दरम्यान त्यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली होती. मात्र आज अचानक 1.52 च्या सुमारास त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला. या झटक्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

कोरिओग्राफर सरोज खान यांचे मूळ नाव निर्मला नागपाल होते.प्रसिद्ध कोरिओग्राफर बी मोहनलाल यांच्याकडून नृत्याचं शिक्षण घेतले होते. वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षी नजराना सिनेमामध्ये त्या झळकल्या होत्या.1950 च्या दरम्यान बॅकग्राऊंड डान्सर म्हणून करिअरला त्यांनी सुरुवात केली होती. 1974 ला आलेल्या गीता मेरा नाम पासून स्वतंत्र डान्स कोरिओग्राफी मध्ये पदार्पण केले होते. मात्र नावारूपास येण्यासाठी तब्बल दहा वर्षांच्या वर काळ लागला.

दरम्यान श्रीदेवी यांना कोरिओग्राफ केलेला 1986 सालचा नगीना, 1987 ला आलेला मिस्टर इंडिया आणि 1989 ला आलेला चांदणी या सिनेमांनी सरोज खान यांना प्रसिद्धी मिळाली होती. याच दरम्यान म्हणजे 1988 रोजी माधुरी दीक्षित ला एक दो तीन या तेजाब मधील गाण्यात त्यांनी कोरिओग्राफ केले आणि त्या सुपरहिट ठरल्या. पुढे 1990 ला माधुरी सोबत ठाणेदार मधील केलेलं तम्मा तम्मा लोगे गाणं गाजलं. 1992 मधील माधुरीला बेटा सिनेमातील धकधक करने लगा या गाण्यात त्यांनी कोरिओग्राफ केलं आणि बॉलीवूडच्या टॉप कोरिओग्राफरमध्ये त्यांचं नाव नमूद केलं गेलं.

तसेच 2019 मध्ये आलेला कलंक हा त्यांचा कोरिओग्राफी केलेला शेवटचा सिनेमा ठरला. योगायोग म्हणजे या सिनेमात सुद्धा त्यांनी माधुरीला कोरिओग्राफ केलं होतं. 2003 मधील देवदास, 2006 मधील शृंगार आणि दोन हजार आठ मधील जब वी मेट सिनेमांसाठी सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफी चा राष्ट्रीय पुरस्कार सरोज खान यांना प्रदान करण्यात आला होता. अशी जवळपास सरोज खान यांनी 2000हून अधिक गाणी कोरिओग्राफ केली. म्हणूनच त्यांना मदर ऑफ कोरिओग्राफी असं संबोधलं जात. तब्बल 40 वर्ष सरोज खान यांनी बॉलीवूडला आपल्या तालावर थिरकवलं होते.

फिल्मफेअर पुरस्कार प्राप्त

  • 1989 तेजाब
  • 1990 चालबाज
  • 1991 सैलाब
  • 1993 बेटा
  • 1994 खलनायक
  • 2000 हम दिल दे चुके सनम
  • 2003 देवदास
  • 2008 गुरु

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Monsoon Updates;मुंबई, ठाणे, पालघरात मुसळधार पावसाची शक्यता

वारीत यंदाचं चैतन्य हरवलं !