in

…आणि पक्ष आधीपेक्षा जास्त ताकदीने पुढे आला… सेनेचं प्रत्युत्तर!

लोकशाही न्यूज नेटवर्क
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवलीत नारायण राणे यांच्या वैद्यकीय महाविद्यालयाचे उद्घाटन केले. यावेळी भाषणादरम्यान त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल केला. सत्तेच्या मोहात बाळासाहेब ठाकरे यांच्या सिद्धांतांना नदीत सोडले, आम्ही जर असं वागलो असतो, तर शिवसेना उरलीच नसती, असे अमित शाह म्हणाले. यानंतर आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रत्युत्तर देत ट्वीट केले आहे.

“१९७५मध्ये रजनी पटेल आणि नव्वदच्या दशकात मुरली देवरा शिवसेना संपेल असे म्हणाले होते. पुन्हा २०१२ साली पृथ्वीराज चव्हाण यांनीही असंच म्हटलं होतं. आणि दोन्ही वेळा शिवसेना पूर्वीपेक्षा अधिक ताकदीने पुढे आली. जय महाराष्ट्र..!” अशा शब्दांमध्ये राऊत यांनी अमित शाहांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

विधानसभेच्या निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपाशी काडीमोड घेत महाविकास आघाडीचा पर्याय स्वीकारला. यासाठी ५०-५०चा फॉर्म्युल्यावर पाणी सोडण्यात आले. भाजपाने या समीकरणाला दुजोरा न दिल्याने शिवसेनेने हा निर्णय घेतला. मात्र त्यावेळी बंद दाराआड झालेल्या या चर्चेवर आज अमित शाह यांनी तोंड फोडलं. या प्रकारचे कोणतेही वचन दिले नसल्याचे सांगत महाविकास आघाडीतील मित्र पक्षांवर घणाघाती टीका केली.
याला प्रत्युत्तर देत संजय राऊत यांनी शिवसेना बुडवायला निघालेल्यांना इतिहासाची आठवण करून दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

उत्तराखंड हिमस्खलन : मृतांना प्रत्येकी चार लाखांची मदत, बचावकार्य सुरू

नौदल अधिकारी अपहरण प्रकरणात ‘ट्विस्ट’; मृत्यूचं गूढ उलगडलं!