लोकशाही न्यूज नेटवर्क
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासोबत खुलं वॉर सुरू असल्याचं सांगितलं. राज्य सरकारचे अनेक निर्णय रखडले आहेत. राज्यपाल भाजपाच्या दबावाखाली काम करत असल्याने हे झाल्याचं त्यांनी सांगितले. त्यामुळे युद्ध थेट राज्यपालांकडून नाही, तर त्यांच्या आड भाजपाकडून खेळण्यात येत आहे, असा आरोप राऊत यांनी केला आहे.
“राज्य मंत्रिमंडळाच्या शिफारसी स्वीकारणे हे राज्यपालांना बंधनकारक आहे, असं राज्यघटना सांगते. मात्र, राज्य सरकारने शिफारस केलेल्या 12 आमदारांचा निर्णय राज्यपालांनी प्रलंबित ठेवलाय. ही घटनेची पायमल्ली आहे. याचा अर्थ राज्यपाल हे राजकीय दबावाखाली काम करत आहेत, म्हणून हे खुलं युद्ध आहे, शीतयुद्ध नाही.”
खासदार संजय राऊत नाशिकमध्ये शिवसेनेच्या नव्या कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी नाशिकचेही चित्र लवकरच बदलेल अशी आशा व्यक्त केली. पक्षभेद विसरून आमदारांचा निधी त्यांना मिळावा याबाबत भुजबळ यांच्याशी चर्चा झाली असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.
Comments
Loading…