in ,

‘आणीबाणी बरी होती असं म्हणावं लागेल अशी आजची देशाची परिस्थिती’

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. भाजपाचे लोक आजही इंदिरा गांधींच्या काळातील आणीबाणीच्या नावानं दळण दळतात. मात्र, देशातील आजची स्थिती आणीबाणी बरी होती, असं म्हणावं लागेल अशी आहे, अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपा सरकारवर टीका केली आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लादलेला आणीबाणीचा निर्णय चुकीचा होता, असं विधान नुकतंच राहुल गांधी यांनी केलं होतं. याप्रकरणावरून राऊत यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

‘राहुल हे फार सरळ आणि मोकळ्या मनाचे आहेत. ते सहज बोलून गेले आणि त्यावर चर्चा सुरू झाली. इंदिरा गांधी यांनी विशिष्ट परिस्थितीत आणीबाणी लादली. त्याला एका कालखंड उलटून गेला आहे. ज्यांचा आणीबाणीसोबत कसलाही संबंध नाही तेच लोक आज राजकारण आणि पत्रकारितेत आहेत. देशातील आजची परिस्थिती तर आणीबाणीहून भयानक आहे, अशा शब्दांत राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

दिशा रवी या २२ वर्षीय मुलीस इतकं का घाबरायचं. जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीस हे शोभतं का, असा सवालही राऊत यांनी केला. जनतेला दिलेल्या आश्वासनासंबंधी तीच बेफिकिरी, तीच विलासी राहणी, वृत्तपत्रांसह मीडिया हाऊसेसवर राजकीय नियंत्रण, निवडणुका जिंकण्यासाठी, विरोधकांना खच्ची करण्यासाठी त्याच क्षुद्र कारवाया, तेच डावपेच. घटनात्मक संकेत पायदळी तुडविण्याबाबत तोच उतावीळपणा. सर्व काही १९७५ प्रमाणेच तर सुरू आहे. मग देशाची आजची परिस्थिती आणीबाणीपेक्षा काय वेगळी आहे, असा सवाल राऊत यांनी केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राम मंदिरासाठी घरोघरी जाऊन देणगी गोळा करणं बंद

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर