in

‘मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…’

“ज्यांना पतंग उडवायचीये, त्यांनी उडवावी. कुणाची पतंग कधी कापायची, हे आम्हाला समजतं”, असं संजय राऊत म्हणाले आहेत. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या औरंगाबाद दौऱ्यामधील वक्तव्यासंदर्भात त्यांना विचारलं असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात बोलताना केलेल्या एका विधानावरून तर्क-वितर्क सुरू झाले आहेत. व्यासपीठावर बसलेले रावसाहेब दानवे आणि भागवत कराड यांच्याकडे बघून त्यांनी “आजी, माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी”, असा उल्लेख केल्यानंतर शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

काय म्हणाले राऊत?

‘मुख्यमंत्री ठाकरे यांची एक भाषण करण्याची स्टाईल आहे. त्या पद्धतीने त्यांनी हे भाषण केलं आहे. त्यांनी असं कुठेही म्हटलेलं नाही की नवीन आघाडी होईल, आम्ही या सरकारमधून बाहेर पडू. त्यांनी स्पष्ट सांगितलंय की, ज्यांना भावी सहकारी व्हायचंय, ते आमच्याकडे येऊ इच्छित आहेत. राजकारणात ज्या हालचाली दिसत आहेत. चंद्रकांत पाटील म्हणाले की, आम्हाला माजी म्हणू नका, त्या याचबाबतच्या हालचाली आहेत. कुणीतरी तिकडे आहेत, ज्यांना इकडे यायचंय. त्यांच्यासाठी उद्धवजींनी संकेत दिलेत की तुम्ही या’, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘…तर, भाजपातील नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकांतही पराभूत होतील’

करुणा शर्मा प्रकरणात आज सुनावणी