in

‘तुम्हाला सेलिब्रेटी कोणी केलं हे विसरलात का’?

लोकशाही न्यूज नेटवर्क

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देशातील सेलिब्रेटींचा चांगलाच समाचार घेतला आहे. भारतातील सेलिब्रेटींनी भारत सरकारच्या समर्थनार्थ टि्वट केलं. या सर्व सेलिब्रेटींनी आधी शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेणं गरजेचं आहे. आधी समस्या समजून घ्या आणि त्यानंतर आपल्या भूमिका मांडा, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.

आपल्या मागण्यांसाठी थंडी, पावसात शेतकरी आंदोलन करत आहेत. सेलिब्रेटींना यांच्याबद्दल काहीच संवेदना नाही. भाजपानं या सर्व सेलिब्रेटींना गाझीपूर, सिंघू सीमेवर नेलं पाहिजे आणि शेतकरी कशा परिस्थितीत आंदोलन करत आहेत, हे दाखवायला हवं, असेही राऊत म्हणाले.

स्वत:ला सेलिब्रेटी समजणाऱ्या या लोकांना सेलिब्रेटी कोणी केलं, सामान्य, मध्यमवर्गीय माणसानं, कष्टकऱ्यांनं आणि शेतकऱ्यांनीच तुम्हाला डोक्यावर घेतलं, सेलिब्रेटी केलं, असेही राऊत म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘सेलिब्रेटींच्या टि्वटमुळे देशाचं झालेलं नुकसान भरून निघणार नाही’

अपयश लपण्यासाठी केंद्र सरकार राज्य सरकारकडे बोट दाखवतयं – अजित पवार