in

‘घमंड ज्यादा हो तो, हस्तियाँ डूब जाती है’; राऊतांचा पुन्हा शाहंवर निशाणा

लोकशाही न्यूज नेटवर्क

शिवसेना नेते संजय राऊत यांनी अमित शाह यांना पुन्हा एकदा प्रत्युत्तर दिलं आहे. ‘घमंड ज्यादा हो तो हस्तियाँ डूब जाती है’ अशा शब्दांत संजय राऊत यांनी मोदींना टोला लगावला आहे. सिंधुदुर्ग दौऱ्यावर असताना अमित शाह यांनी शिवसेनेवर टीका केली होती. त्याला राऊत यांनी पुन्हा एकदा प्रत्युत्तर दिलं आहे.


राऊत यांचं टि्वट –
‘तुफान ज्यादा हो तो,
कश्तिया डूब जाती है
और घमंड ज्यादा हो तो,
हस्तियाँ डूब जाती है, असं राऊत यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले आहे.

काय म्हणाले होते अमित शाह?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीआधी उद्धव ठाकरे यांना बंद खोलीत कोणतंही वचन दिलं नव्हतं, असं अमित शाह यांनी म्हटलं आहे. शिवसेनेनं खोटंनाटं बोलून आमच्याशी दगाबाजी केली. मी बंद खोलीत वचन दिल्याचं सांगितलं गेलं. मात्र, मी असं कुठलंही वचन दिलं नव्हतं. मी बंद खोलीत नव्हे तर खुलेआम वचन देणारा आणि तो पाळणारा व्यक्ती आहे. आम्ही जर शिवसेनेपमाणे वागलो असतो तर आज महाराष्ट्रातून शिवसेनाच संपली असती, असेही अमित शाह यांनी म्हटलं होतं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

IND vs ENG: भारताचा पहिला डाव ३३७ धावांवर ऑंल आउट

जालनात शिवसेना कार्यकर्त्याला गाडीसह जाळले