in

देशात युद्धजन्य परिस्थिती, दोन दिवसांचं अधिवेशन बोलवा – संजय राऊत

देशात सध्या युद्धजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे या संकटावर चर्चा करण्यासाठी दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलवावं, अशी मागणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केली आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना दुसरीकडे अनेक राज्यांमध्ये बेड्स, व्हेंटिलेटर तसंच ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होण्याची भीती आहे. यासाठी अनेक राज्यांनी केंद्राकडे मदतही मागितली आहे.

राऊत यांचं टि्वट –

‘देशात अभुतपूर्व आणि युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सगळीकडे गोंधळ आणि चिंतेचं वातावरण आहे. बेड नाही, ऑक्सिजन नाही आणि लसदेखील नाही. सगळीकडे गोंधळच गोंधळ आहे. या स्थितीवर चर्चा करण्यासाठी संसेदचं किमान दोन दिवसांचं विशेष अधिवेशन बोलावण्यात यावं. जय हिंद!’, असं टि्वट राऊत यांनी केलं आहे.

महाराष्ट्र, छत्तीसगड, उत्तर प्रदेश, कर्नाटक व केरळ या राज्यांत एकूण ६५.०२ टक्के उपचाराधीन रुग्ण आहेत. एकूण १ कोटी २८ लाख ९ हजार ६४३ रुग्ण बरे झाले आहेत. २४ तासांत बरे झालेल्यांची संख्या १ लाख ३८ हजार २४३ झाली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुथय्या मुरलीधरनची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

येत्या दोन दिवसात बीडमध्ये रेमडेसिवीर उपलब्ध होईल