पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणावरून अनेक गंभीर आरोप असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी अखेर राजीनामा दिला आहे. राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भारतीय जनता पक्षानं गेल्या काही दिवसांपासून आक्रमक भूमिका घेतली होती. त्यावर या राजीनाम्यावरून भाजपने पुन्हा एकदा प्रश्न चिन्ह उपस्थित केले असून भाजप नेते अतुल भातखळकर यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संजय राठोड यांच्यावर निशाणा साधला.
“मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांचा राजीनामा चार दिवसांनंतरही राज्यपालांकडे सोपवला नाही. याचा अर्थ राज्याचे मुख्यमंत्री खोटं बोलत आहेत आणि ते खोटारडे आहेत हे यावरून सिद्ध होत आहे. प्रश्न इतकाच आहे की संजय राठोड हे मुख्यमंत्र्यांच्या हृदयात आहेत की मुख्यमंत्री हे संजय राठोडांच्या खिशात आहेत. खोटं बोलणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा आणि महिलांविषयी असंवेदना प्रगट करणाऱ्या मुख्यमंत्र्यांचा भाजप निषेध व्यक्त करते,” असंही भातखळकर म्हणाले.
तसेच भाजपाच्या महिला नेत्या चित्रा वाघ यांनी देखील आक्रमक पावित्रा घेतला होता राठोड यांनी राजीनामा दिला मात्र हा राजीनामा अद्यापही राज्यपालांना भेटलेला नाही त्यांच्या राजीनामा राज्यपालांपर्यंत पोहचायला इतका वेळ का लागतोय. राजीनामा मातोश्री नाही तर शिवसेना भवनात फोटो फ्रेम करून ठेवला आहे का ? असा खोचक सवालही त्यांनी या वेळी शिवसेनेला केला .
Comments
Loading…