पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे चर्चेत असलेले वनमंत्री संजय राठोड मागील १५ दिवसांपासून गायब होते. परंतु तब्बल १५ दिवसांनतर वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड घरी दाखल झाले आहेत. मंत्री संजय राठोड यांच्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. शिवसेना नेते संजय राठोड मंगळवारी पोहरादेवी मंदिरात येणार असून रस्त्यावर बॅरिकेट लावले असून बॉम्ब नाशक पथकही मंदिर परिसरात दाखल झाले आहेत.
पोहरादेवी परिसरात मोठी गर्दी होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. वनमंत्री संजय राठोड यांच्या घराबाहेर त्यांचे शासकीय वाहनही उभे कऱण्यात आले आहे. वनमंत्री संजय राठोड पोहरादेवीत शक्तीप्रदर्शन करणार असल्याचे म्हटले जात आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पोहरादेवी संस्थानाला नोटीस बजावण्यात आली आहे. पोहरादेवी परिसरात मोठी गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त केला आहे. मंदिरात ५० जाणांच्या उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे.
संजय राठोड यांच्या पोहरादेवी दौऱ्याचा तपशील खालीलप्रमाणे :
- संजय राठोड दुपारी एक वाजता संजय राठोड दारव्हा येथील मुंगसाजी महाराज संस्थानाकडे जाण्यासाठी निघतील.
- दुपारी 2.30 च्या सुमारास संजय राठोड दारव्हा येथील मुंगसाजी महाराज संस्थानात पोहोचतील.
- दुपारी साडेतीनच्या सुमारास संजय राठोड जिल्हाधिकारी कार्यालयात जातील. याठिकाणी कोरोना प्रसार रोखण्यासंबंधीच्या उपाययोजनांचा ते आढावा घेतील.
- यानंतर संजय राठोड यवतमाळ येथील निवासस्थानाच्या दिशेने रवाना होतील.
Comments
Loading…