in

सॅनिटायझर पाजल्याप्रकरणी दोन वैद्यकीय अधिकारी निलंबित

लोकशाही न्यूज नेटवर्क
यवतमाळमध्ये १२ बालकांना पोलिओ लस ऐवजी सॅनिटायझर पाजल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या प्रकरणी आता चौघांवर कारवाई करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेची चौकशी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ करत आहेत. या संदर्भात अधिकारी डॉ. भूषण मसराम वैद्यकीय अधीकारी डॉ. महेश मनवर यांना निलंबित करण्यात आले. या कारवाईमुळे आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.

यवतमाळमधील घाटंजी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या कापसी कोपरी येथे पोलिओ लसीकरणादरम्यान लहान मुलांना सॅनिटीझर पाजण्यात आलं होतं. 1 ते 5 वयोगटातील ही मुले आहेत. सध्या सर्व मुलांची धोक्याच्या बाहेर आहेत . या प्रकरणी वैद्यकीय अधिकारी भूषण मसराम, वैद्यकीय अधिकारी महेश मनवर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तर समुदाय आरोग्य अधिकारी अमोल गावंडे आणि आशा वर्कर संगीता मसराम यांच्यावर सेवा समाप्तीची कारवाई करण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

farmers protest : ट्विट करणाऱ्या सेलिब्रिटींचा अजित पवारांनी घेतला खरपूस समाचार

न्यायालय म्हणतंय, राज ठाकरे हाजिर हो… मनसैनिक ग्रॅण्ड वेलकमच्या तयारीत!