in

कोयनासह चांदोली धरणातून कृष्णा, वारणेत विसर्ग; नद्यांच्या पाणीपातळीत वाढ…

सांगली-सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील पाऊस आणि सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात बरसणाऱ्या पावसामुळे कोयना आणि चांदोली धरणाच्या पाणी साठ्यात वाढ झाली आहे. दोन्ही धरणांतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग कृष्णा आणि वारणा नद्यांमध्ये करण्यात येत आहे.

कोयना धरणातून ४० हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे, तर दुसर्‍या बाजूला शिराळा तालुक्यातील चांदोली धरण ९९.८६ टक्के भरले आहे.चांदोली धरणातुन सुरू असणारा विसर्ग वाढवून तो ८ हजार क्यूसेक्स करण्यात आला आहे. सांगली जिल्ह्यातील वारणा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे.

कृष्णा नदीच्या पाणी पातळीत ही हळूहळू वाढ होत आहे. मंगळवारी दुपारपर्यंत कृष्णा नदीची पाणी पातळी ही २० ते २२ फुटांपर्यंत जाण्याचा अंदाज प्रशासनाकडून वर्तवण्यात आला आहे. कोयना आणि चांदोली धरणातून सोडण्यात येणारे पाणी, त्यामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत होणारी वाढ लक्षात घेऊन नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुलींना लाईन द्यायला सांगा; तरूणाचे थेट आमदारांनाच पत्र

हसन मुश्रीफ कुटुंबांकडून 127 कोटींचा घोटाळा; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप