in

अर्जुन कपूर आणि परिणीतीच्या ‘संदीप और पिंकी फरार’चा ट्रेलर रिलीज

अभिनेत्री परिणीती चोप्रा आणि अभिनेता अर्जुन कपूर ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही जोडी ‘इश्कजादे’, ‘नमस्ते इंग्लंड’ या चित्रपटात दोघांची जोडी झळकली. आता पुन्हा एकदा एका वेगळ्या अंदाजात परिणीती आणि अर्जुन यांची जोडी चाहत्यांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दिबाकर बॅनर्जी यांनी केले आहे.

येत्या 19 मार्चला चित्रपटगृहात परिणीती चोप्रा आणि अर्जुन कपूर यांचा ‘संदीप और पिंकी फरार’ हा चित्रपट रिलीज होत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मोठा सस्पेंस पाहायला मिळत आहे. टिपीकल लव्हस्टोरी या चित्रपटात नसून एक वेगळाच थरार पाहायला मिळणार हे ट्रेलर पाहिल्यावर लक्षात येत आहे. ट्रेलरमध्ये अर्जुन कपूर परिणीती चोप्राला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसते. तर ट्रेलरच्या शेवटामुळे तर प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच ताणली गेली आहे.

हा चित्रपट गेल्या वर्षी म्हणजेच मार्च 2020 मध्येच रिलीज होणार होता. यावेळी चित्रपटाचा पहिला टीझरही रिलीज करण्यात आला होता. पण कोरोना आणि लॉकडाऊनच्या विळख्यात चित्रपटाचे प्रदर्शन रखडले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पृथ्वीची ‘शॉ’नदार खेळी; मुंबईचा उपांत्य फेरीत प्रवेश

जळगाव शहरात ११ ते १५ मार्चदरम्यान जनता कर्फ्यू