लोकशाही न्यूज नेटवर्क
फोटोग्राफीसाठी जर तुम्ही नवीन स्मार्टफोनचा विचार करत असालं तर सॅमसंगने तुमच्यासाठी एक उत्तम फोन आणला आहे. सॅमसंगचा बहुचर्चित Samsung Galaxy F62 लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. कंपनी त्यांच्या लोकप्रिय गॅलेक्सी Fसिरीजमधील हा नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. या फोनच्या लाँचिंग डेटसह नुकताच या फोनच्या रियर आणि फ्रंट पॅनलच्या डिझाईनवरील पडदा हटवण्यात आला आहे.
सॅमसंगच्या या फोनमध्ये पंचहोल डिझाईनचा डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच याच्या रियर पॅनेलवर ग्रेडियंट फिनिश आणि एलईडी फ्लॅश सोबत स्क्वेयर शेप कॅमेरा मॉड्यूल देण्यात आला आहे. फोनमध्ये तुम्हाला साईड फेसिंग फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. या फोनमध्ये 7000mAh क्षमतेची बॅटरी आणि 6.7 इंचाचा SAMOLED डिस्प्ले दिला जाणार आहे. हा फोन 8 जीबी रॅम प्लस 128 जीबी इंटर्नल स्टोरेजसोबत लाँच केला जाणार आहे.
प्रोसेसर
Samsung फ्लॅगशिप 7nm Exynos 9825 प्रोसेसर हा दमदार असल्याचे याआधीही अनेकदा स्पष्ट झाले आहे. हा प्रोसेसर अधिक वेगवान, सक्षम आणि फास्ट परफॉर्मिंग आहे. हा फोन Galaxy F41 या फोनचे अपग्रेडेड वर्जन आहे. Samsung Galaxy F62 या स्मार्टफोन फ्लॅगशिप 7nm Exynos 9825 प्रोसेसरसोबत लाँच केला जाणार आहे. जो स्नॅपड्रॅगन 765 जी पेक्षा अधिक दमदार असेल. हा प्रोसेसर चांगला व्हिडीओ Viewing experience देतो.
किंमत
फोटोग्राफीसाठी Samsung Galaxy F62 या फोनमध्ये 64 मेगापिक्सलचा क्वाड कॅमेरा सेटअप असेल, तर सेल्फीसाठी यामध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळू शकतो. या फोनची किंमत 25 हजार रुपयांपेक्षा कमी असेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
Comments
Loading…