in

संबित पात्रा तर नरेंद्र मोदी यांच्याही पुढे…

लोकशाही न्यूज नेटवर्क

काही नेत्यांची विधानं म्हणजे सोशल मीडियाला आयतं खाद्य मिळतं. आणि त्याहून मीमर्सची तर ‘सोय’ होते. कारण भाजपाचे नेते संबित पात्रा यांना आपण नेहमी पक्षाची बाजू मांडताना पाहतो. कधीकधी ते उतावीळ होत कानपिचक्याही घेतात. मात्र, शेतकरी आंदोलनावरून त्यांनी अजब भाष्य केलंय. सध्या पात्रा यांच्या पत्रकार परिषदेचा व्हीडियो सगळीकडे गाजतोय. पत्रकार परिषदेत राजकीय प्रवक्त्यांनी विरोधकांवर शरसंधान साधणे हे स्वाभाविक आहे. मात्र पात्रा यांनी काँग्रेसला प्रतिप्रश्न करताना कहरच केला.

शेतकरी आंदोलनावरून विरोधकांवर निशाणा साधताना पात्रा यांनी १९८४ च्या शिख दंगलींचा संदर्भ दिला. आत्ता कृषी कायद्यांवरून सरकारविरोधी ट्वीट करणाऱ्यांचा जन्म त्यावेळी झाला नसेल, मात्र या फळीतील कोणीही त्यावेळी ट्वीट केलं नाही, असे संबित पात्रा म्हणाले. काश्मीरच्या पंडितांवर झालेल्या हल्ल्यांवेळी देखील कोणीही ट्वीट नाही केलं. त्यावेळीही मानवाधिकारांचा मुद्दा समोर आला होता. मात्र आज राहुल गांधी आणि पॉपस्टार रिहाना ट्वीट करत आहेत, असे पात्रा म्हणाले.

खरंतर १९८४ साली देशात सोशल मीडिया हा ट्रेंड नव्हता. तसेच त्यावेळी अॅन्ड्रॉइड स्मार्टफोन्स आणि ट्विटरचा शोध देखील लागायचा होता. त्यामुळे पात्रा यांच्यावर आता नेटीझन्सने टीकेचा पाऊस पाडला आहे.

पंतप्रधान मोदींनी १९८८मध्ये कॅमेऱ्यात फोटो काढून केला ई-मेल

पात्रा यांच्या विधानानंतर त्यांचे राजकीय गुरू म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एक मुलाखत पुन्हा चर्चेत आली आहे. पंतप्रधान मोदी यांनी एका खासगी चॅनलला दिलेल्या मुलाखतीत, आपण 1988 मध्ये डिजीटल कॅमेऱ्याने फोटो काढून तो ई मेल केला होता, असं म्हटलं होतं. यानंतर सोशल मीडियावर प्रत्येकजण या दाव्याचं सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न करत होता. मोदींनी 1987-88 च्या दरम्यान ई मेल केल्याचं सांगितलं. पण ई मेलची सेवा 1995 पासून सर्वांसाठी सुरू झाल्याने, मोदींना ट्रोल करण्यात आलं. आता हेच ट्रोलींग पात्रा यांच्यासोबत सुरू आहे.

काय म्हटले मोदी?

1987-88 मध्ये मी पहिल्यांदा डिजीटल कॅमेऱ्याचा वापर केला. त्यावेळी अनेकांजवळ ई-मेल होते. माझ्या गावात विरमगाम येथे आडवाणी यांची सभा होती. मी माझ्या डिजीटल कॅमेऱ्याने त्यांचा फोटो घेतला आणि दिल्लीला पाठवला, असा दावा मोदींनी केला होता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Uttarakhand | तपोवन धरणात अडकलेल्या 16 जणांना बचावण्यात यश

पुणे-बंगळूर महामार्गावर भीषण अपघात; चौघांचा मृत्यू