in

मराठा आरक्षण | मूक मोर्चाचा एल्गार, “आता आमदार-खासदार बोलतील!”

मराठा समाजाच्या आरक्षणावर संभाजीराजे छत्रपती यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यासाठी त्यांनी १६ जूनला कोल्हापुरातून मूक मोर्चा काढणार असल्याची घोषणा केली. आता समाज बोलणार नाही, तर आता आमदार, खासदार आणि मंत्री बोलतील, असं म्हणत त्यांनी आंदोलन छेडलं आहे. १६ जूनपासून कोल्हापुरातून या आंदोलनाची सुरुवात होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. त्याचबरोबर मागण्या मान्य न झाल्यास पुणे ते मंत्रालयापर्यंत लाँगमार्चचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

कोल्हापूरमध्ये झालेल्या मराठा समन्वयकांच्या बैठकीत त्यांनी मूक आंदोलन छेडत असल्याची माहिती दिली. १६ जून रोजी होणारं हे आंदोलन कोल्हापुरातल्या शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी दिली. राज्याच्या ३६ जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. ते म्हणाले, आत्तापर्यंत समाज खूप बोलला पण आता आपण नाही बोलायचं. आता आमदार, खासदार, मंत्री बोलतील. आता मराठा समाजाच्या आरक्षणाची जबाबदारी आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी घेतली पाहिजे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Organ Donation |वर्धात मरणोत्तर अवयवदानाने चार व्यक्तींना जीवनदान

ठेकेदाराचा हलगर्जीपणा; तीन तालुक्यांचा संपर्क तुटला