in

मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही बाबासाहेबांची इच्छा – संभाजीराजे

संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणावर आक्रमक होत विविध राजकीय नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली. मराठा समाजातील अशांतता मिटवण्याचा प्रयत्न संभाजीराजे राज्यभर दौरे करून करत आहेत. याचसंदर्भात त्यांनी शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात, राज ठाकरे, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आज त्यांनी पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचीही भेट घेतली. या बैठकीनंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी भाजपावर टीका केली.

भारतीय जनता पक्षाचा आरक्षणाला विरोध आहे. आरक्षणाच्या मुदद्यावर बाबासाहेबांनी देखील राजीनामा दिला होता, असे आंबेडकरांनी सांगितले. आरक्षण हे समाजाला व्यवस्थेशी जोडण्याचं एक साधन आहे. पहिली घटना दुरुस्ती ही आरक्षणाच्या मुद्द्यावरूनच झाली. दोराईस्वामी यांचं हे प्रकरण होतं, असे ते म्हणाले.

शाहू महाराज आणि आंबेडकर एकत्र होते..तर मी आणि प्रकाश आंबेडकर यांनी का एकत्र येऊ नये, असं संभाजीराजेंनी म्हटलंय. मराठा आणि बहुजन समाजाने एका छताखाली येण्याची गरज असल्याचे छत्रपती म्हणाले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maratha Reservation संभाजीराजे आणि प्रकाश आंबेडकर यांची पुण्यात खलबतं

OBC Reservation ओबीसी समाजावर अन्याय, फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र