in

काळवीट शिकार प्रकरणी सलमान खानला कोर्टात हजर राहण्याचे आदेश

Share

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला 28 सप्टेंबरला जोधपूर न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सोमवारी या प्रकरणाची सुनावणी झाली असून सलमानच्या याचिकेवर काळवीट शिकार प्रकरणाची सुनावणी आणि राज्य सरकारच्या याचिकेवर शस्त्र कायद्या प्रकरणाची सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही. पुढील सुनावणीच्या वेळी सलमानला स्वत: कोर्टात हजर होण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे 28 सप्टेंबरला सलमानला जोधपूर न्यायालयात हजर रहावे लागणार आहे.

हम साथ साथ है या चित्रपटाचे चित्रीकरण राजस्थानमध्ये सुरू असताना सलमान आणि या चित्रपटातील त्याच्या काही सहकलाकारांनी काळवीटाची शिकार केली असल्याचा त्यांच्यावर आरोप लावण्यात आला होता. या प्रकरणात सलमानला दोषी ठरवण्यात आले असले तरी त्याचे सहकलाकार अभिनेता सैफ अली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांना निर्दोष ठरवण्यात आले होते.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Parliament Session : संसदेच्या पावसाळी अधिवेशनात 25 खासदारांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

पदवीधरांसाठी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी