in

साकीनाका महिला बलात्कार आणि मृत्यु प्रकरण; आरोपीला 10 दिवसांची पोलीस कोठडी

मुंबईतील साकीनाका परिसरातील बलात्कार मृत्यू प्रकरणात आता आरोपी मोहन चौहानला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बांद्रा न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

शुक्रवारी मध्यरात्री मुंबईतील साकीनाका येथील खैरानी रोड परिसरात महिलेवर बलात्कार करण्यात आल्यानंतर आरोपीने गुप्तांगात रॉड घुसवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. जखमी अवस्थेत महिलेला उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र मृत्यूशी तिची झुंज अपयशी ठरली आहे. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी मोहन चौहानला अटक केली आहे. मात्र यामध्ये अजून काही जण सहभागी असल्याचा संशय आहे.

मुंबईतील साकीनाका बलात्कार मृत्यू प्रकरणात आता आरोपी मोहन चौहानला बांद्रा न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी बांद्रा न्यायालयाने आरोपीला 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Heavy rainfall in delhi | राजधानीत पाणीच पाणी, विमानतळावरील धावपट्टीही पाण्याखाली

Gold Price Today: सोन्याच्या दरात वाढ