in ,

saira banu | जेष्ठ अभिनेत्रीची तब्येत खालावली ICU मध्ये उपचार सुरू

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्यासोबत ५४ वर्षांपासून एकत्र राहणाऱ्या अभिनेत्री सायरा बानू (saira banu) यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला आहे. दिलीप कुमार यांचे निधन होऊन दोन महिने झाले आहेत. परंतु त्यांच्या मृत्यूच्या दुःखातून अजून सायरा बानू काही सावरू शकल्या नाहीत. याचा परिणाम त्यांच्या प्रकृतीवर खूप होत आहे. गेल्या तीन दिवसांपासून मुंबईतील हिंदुजा रुग्णालयातील (hinduja hospital)आय सी यू मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

सायरा बानू ७६ वर्षांच्या आहेत. जेव्हा २२ वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांनी दिलीप कुमार यांच्यासोबत लग्न केले होते. पण दिलीप कुमार यांच्या मृत्यूनंतर सायरा बानो यांची काळजी कशी घ्यावी? हे त्यांच्या कुटुंबियांना समजत नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, सायरा बानो यांची प्रकृती स्थिर आहे. परंतु त्यांचा बीपी नॉर्मल होत नाही आहे. त्यांची ऑक्सिजन लेव्हल लो (oxygen level low) असल्यामुळे त्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. त्यामुळे अजूनही तीन ते चार दिवस त्यांना रुग्णालयात राहावे लागणार आहे.

सायरा बानू एक भारतीय चित्रपट अभिनेत्री आहे जी बॉलिवूडमध्ये ठळकपणे काम करते. ती भारतीय चित्रपट इतिहासातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. १९७१ ते १९७६ या काळात बानू हिंदी चित्रपटसृष्टीतील तिसऱ्या आणि सर्वात जास्त मानधन घेणारी अभिनेत्री होती . १९६० मध्ये बानू १६ वर्षांच्या होत्या तेव्हा तिने हिंदी चित्रपट सृष्टीमध्ये पदार्पण केले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘बिग बॉस’च्या घरात होणार गंगा एण्ट्री?

ड्रग्स प्रकरणात अभिनेता अरमान कोहली याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी