in

सचिन वाझेंचा शिवसेनेशी संबंध काय, उद्धव ठाकरे म्हणाले…

मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानी स्फोटकाने भरलेल्या गाडीचा वाहन चालक मनसुख हिरेन मृत्यु प्रकरणात API सचिन वाझे यांचे नाव चर्चेत आहे. विधानसभेत याच विषयावरून विरोधी पक्षनेत्यांनी आक्रमक होत सचिन वाझेवर कारवाई मागणी केली. यावर सरकारने त्यांच्या बदलीचे आदेश दिले. मात्र सचिन वाझे कोणी लादेन नाहीत, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी पत्रकार परिषद घेत दिली.


सचिन वाझे यांच्या बदलीची घोषणा गृहमंत्र्यांनी केली असली, तरी त्यांना अटक करा अशी मागणी भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावर प्रत्येक गोष्टीसाठी यंत्रणा आहे. ती तपास करेल असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेचं तपास यंत्रणा भारी असेल तर पोलीस यंत्रणा रद्द करुन टाकायची का? असा सवाल त्यांनी केला.

ठाकरे पुढे म्हणाले, विरोधी पक्षनेत्यांकडे सीडीआर मागितला आहे. न्यायाची पद्धत असतील तर त्यांनी जाहीर कराव असे आवाहनही केले. तसेच सीडीआर तपास यंत्रणेला द्या, त्यातील माहिती तपासू द्या. त्यावर पटकन भाष्य करणं योग्य नसल्याचेही त्यांनी म्हटले.

दरम्यान मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझे यांचे नाव चर्चेत आल्यानंतर त्यांचा शिवसेनेशी सबंध असल्याचे आरोप विरोधक करत आहेत. हा आरोप खडत उद्धव ठाकरे यांनी सचिन वाझे पूर्वी शिवसेनेत होते. त्यांनी सदस्यत्व पुन्हा घेतलेलं नाही. त्यांचा शिवसेनेशी संबंध नसल्याची माहिती दिली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात लबाड सरकार….

महाशिवरात्री विशेष : ‘आत्मारामा’ला शोधायचा प्रयत्न म्हणजेच ‘महाशिवरात्र उपासना’