पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या एनआयए कोठडीत वाढ करण्यात आली आहे. वाझे यांना 9 एप्रिलपर्यत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे.
अंबानी स्फोटक प्रकरण आणि मनसुख हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या आरोपी सचिन वाझे, विनायक शिंदे नरेश गौर या तिघांची कस्टडी संपत होती. यामुळे तिघांना आज सेशन कोर्टात हजर केले होते.
दरम्यान सेशन कोर्टाने पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्या एनआयए कोठडीत 9 एप्रिलपर्यत वाढ केली. तसेच त्याच्यासोबतचे सहआरोपी विनायक शिंदे नरेश गौर यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.
Comments
Loading…