in

सचिन वाझे हे हरामखोर की नॉटी? – सुधीर मुनगंटीवार

आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे. यावेळी पोलीस अधिकारी सचिन वाझे प्रकरणावरुन विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच आरोप-प्रत्यारोप पाहिला मिळाले. पण या गदारोळात भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात रंगलेली जुगलबंदी चर्चेचा विषय ठरली.

राज्य सरकारमधल्या विदर्भातल्या मंत्र्यांना दिलेल्या खात्यांवरुन सुधीर मुनगंटीवार यांनी टोला लगावला. तर पक्षात सिनिअर असूनही मुख्यमंत्रीपद मुनगंटीवार यांना मिळालं नाही, त्यांच्या मनातलं दुख आम्ही समजू शकतो असं प्रत्युत्तर अनिल देशमुख यांनी दिलं. यावर सचिन वाझे हे हरामखोर की नॉटी आहे सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. तसेच काही पक्षाचं ‘सचिन’वर प्रेम आहे तर कांहींच स’चीन’वर प्रेम आहे. आरोपींना वाचवण्यासाठी नागपूरच्या आनिल देशमुख यांना गृह खात दिल असे यावेळी सांगितले.

मधल्या काळात शिवसेना खासदार संजय राऊत आणि अभिनेत्री कंगना रानौत यांच्यामध्ये वाद झाला असताना, तेव्हा संजय राऊत यांनी कंगनाला हरामखोर, असे म्हटले होते. नंतर त्यावर यावर स्पष्टिकरण देताना, माझ्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. कंगना थोडी नॉटी आहे. मी तिची वक्तव्ये पाहिली आहेत. ती साधारणपणे, असे बोलतच असते. कंगना नॉटी गर्ल आहे. माझ्या भाषेत मला तिला बेईमान म्हणायचे होते आणि असे म्हणण्यासाठी आम्ही त्या शब्दाचा (हरामखोर) वापर करतो असे संजय राऊत यांनी म्हटलं होते. त्याचपार्श्वभूमीवर आज विधानसभेजवळ भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सचिन वाझे प्रकरणावरून हरामखोर की नॉटी आहे असा सवाल उपस्थित केला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुंबईच्या रस्त्यावर धावू लागली घोड्याविना व्हिक्टोरिया, आनंद महिंद्रांकडून कौतुक

आयएनएस करंज पाणबुडीचा भारतीय नौदलात समावेश