in

Sachin Vaze | अँटिलिया प्रकरण सोडाच…वाझेची याहून मोठी प्लानिंग होती!

सचिन वाझे प्रकरणातून रोज नवनवीन खुलासे समोर येत असताना आता अँटिलियाबाहेर स्फोटकं प्रकरणानंतर वाझे अजून काहीतरी मोठं करण्याचं नियोजन करत होते, अशी माहिती एएनआयनं एनआयएतील सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. त्यामुळे या प्रकरणामध्ये मोठा खुलासा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

NIA च्या विशेष न्यायालयाने सचिन वाझे यांची कोठडी संपल्यानंतर पुन्हा 23 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. त्यामुळे सचिन वाझेंची रवानगी तळोजा कारागृहात पाठवण्यात आले आहे. दरम्यान अँटिलियाबाहेर स्फोटकं ठेवल्यानंतर देखील सचिन वाझे अजून काहीतरी मोठं करण्याचं नियोजन करत होते, अशी माहिती एएनआयनं एनआयएतील सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

या प्रकरणात नुकतीच एनआयएनं सचिन वाझेंचे सहकारी आणि एन्काऊंटर स्पेशालिस्ट म्हणून एकेकाळी ओळख असलेले निवृत्त पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांची चौकशी केली आहे. सलग दोन दिवस प्रदीप शर्मा यांची चौकशी करण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘लसीचा तुटवडा असताना पाकिस्तानला पुरवठा का?; जयंत पाटलांचा पंतप्रधानांना सवाल

‘या’ शहरात मिळतेय कोरोना लस घेणाऱ्यांना मोफत बिअर