in ,

Sachin Tendulkar Corona : सचिन तेंडुलकर कोरोना पॉझिटिव्ह; काही दिवसांपूर्वीच घेतली होती लस

क्रिकेट विश्वातून कोरोनाबाबत एक धक्कादायक बातमी समोर येते आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत सचिनने स्वत: याबाबत माहिती दिली आहे. मी काळजी घेत आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्या, असं सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे.

भारताच्य दिग्गज क्रिकेटर्स पैकी एक असणाऱ्या सचिन तेंडुलकरने पॉझिटिव्ह असल्याची माहिती देताच चाहत्यांची चिंता वाढली आहे. पण सचिनने असेही म्हटले आहे की त्याच्यामध्ये आढळून आलेली लक्षणं सौम्य स्वरूपातील आहेत. सचिनचे कुटुंबीय निगेटिव्ह आहेत, असेही त्याने सांगितले.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नाना पटोलेंमुळे टळला मोठा अनर्थ

‘देवेंद्र फडणवीसांकडे तो डेटा कसा आला’