in

“ड्रग्ज अॅडिक्टला झाशीची राणी बोलताना लाज वाटली नाही का?”

लोकशाही न्यूज नेटवर्क

कृषी कायद्यांवरून सुरू झालेलं कंगना रणौत प्रकरण सध्या सोशल मीडियावर चांगलंच तापलंय. अभिनेत्री कंगनाने सोशल मीडियावर केलेल्या ट्विटमुळे नेटीझन्समध्ये वॉर सुरू झालं आहे. यामुळे भक्त आणि विरोधक असे गट तयार झाले असून सध्या वातावरण ढवळून निघालं आहे. यातच आता काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी कंगनाला लक्ष्य करत भाजपाच्या नेत्यांवर वार केले आहेत.

भाजपा समर्थक नेत्यांकडून शेतकरी आंदोलनाला खालिस्तानी, नक्षलवादी तसेच देशद्रोही संबोधण्यात आले. याच मुद्द्यावर काँग्रेसचे सचिन सावंत यांनी भापजाने कंगनाला दिलेल्या पाठिंब्याचे स्मरण करून दिले आहे.
सावंत यांनी यासंदर्भात ट्विट देखील केले. “देशात अन्नदात्याचा सन्मान सर्वतोपरी आहे. त्याला खालिस्तानी, नक्षलवादी व देशद्रोही म्हणणाऱ्या भाजपा नेत्यांनी मुख्यमंत्र्याचा, महाराष्ट्राचा अपमान करणाऱ्यांची साथ दिली. मुंबई पोलिसांना माफिया, मुंबईला पाकिस्तान बोलणाऱ्या ड्रग्ज अॅडिक्टला झाशीची राणी बोलवताना लाज वाटली नव्हती का?”, अशा आशयाचे ट्विट करत त्यांनी भाजपाला खडेबोल सुनावले आहेत.

दरम्यान, मागील ७० दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर कृषी कायद्याविरोधात आंदोलन सुरू असून आज शेतकऱ्यांनी सीमावर्ती भागात ठिय्या दिला आहे. अद्याप यावर कोणताही तोडना निघाला नसल्याने आता मोठ्या प्रमाणात वातावरण ढवळले आहे.

त्यातच हे शेतकरी आंदोलन नसून खालिस्तानी आंदोलन असल्याचे कंगनाने म्हटले होते. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना दहशतवादी संबोधले होते. यानंतर आता कंगनावरही मोठ्या प्रमाणात टिकेची झोड उठली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वसईच्या क्राइम ब्राँच युनिट दोनच्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला

तिरुपती बालाजीसाठी कोल्हापुरातून विमानसेवा पूर्ववत