in

एस.पी. बालसुब्रमण्यम याचं निधन;सूरांचा बादशाह हरपला

Share

कोरोनाविरुद्ध लढा देणारे प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्राणज्योत मालवली. गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र गेल्या 24 तासात त्यांची प्रकृती नाजूक झाली होती.

५ ऑगस्ट रोजी एस. पी.बालसुब्रमण्यम यांना करोनाची बाधा झाली होती. त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट करुन याबाबतची माहिती दिली होती. त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचं MGM रुग्णालयाने माहिती होती.

एसपीबी यांनी 40 हजारहून अधिक गाणी गायली होती. त्यांनी अभिनय, संगीत दिग्दर्शन आणि चित्रपट निर्मिती क्षेत्रातही उत्तम कामगिरी केली होती. गेल्या चाळीस वर्षांमध्ये केवळ तामिळच नाही तर संपूर्ण भारतातील श्रोत्यांना त्यांच्या मधुर आवाजाने मुग्ध केलं होतं.

एसपी बालासुब्रमण्यम यांची गाजलेली हिंदी गाणी

  • तेरे मेरे बीच में – एक दुजे के लिये
  • ओ मारिया – सागर
  • मेरे रंग में रंगने वाली- मैंने प्यार किया
  • आया है राजा – अप्पू राजा
  • बहुत प्यार करते है – साजन
  • रोजा जानेमन – रोजा

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

कोरोनाबाधितांचा आकडा 58 लाखांच्या पार

…तर मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या घराबाहेर ढोल वाजवणार – गोपीचंद पडळकर